ज्या रेणुकामातेने या परमात्म्यास सर्वप्रथम मानवी मर्यादा धारण करून मानवी रूपात या विश्वात प्रकटवले, त्या माता रेणुकेचे पूजन करण्यामागे श्रद्धावानांचा भाव हाच असतो, श्रद्धावानांची प्रार्थना हीच असते की हे
माते रेणुके, हे मातेश्वरी रेणुके, तू आमच्या जीवनविश्वात या परमात्म्याला प्रकटव.
सहस्रधाराभिषेक
रामनवमीच्या उत्सवात रेणुकामातेच्या तांदळ्याचे षोडशोपचारे पूजन केले जाते. अभिषेकासाठी वापरल्या जाणार्या विशेष अभिषेकपात्राला गायीच्या आचळाप्रमाणे रचना असणार्या अनेक तोट्या असतात. त्यांतून अनेक धारा बरसतात आणि त्याद्वारे रेणुकामातेच्या तांदळ्यावर सहस्रधाराभिषेक केला जातो, जो पाहणे हा हृदयंगम सोहळा असतो. या पूजनविधिंना पाहताना, रेणुकामातेस पाहताना मातृप्रेम उसळी मारतेच.
सदगुरु श्री अनिरुद्धांचा सहभाग
स्वतः बापू रेणुकामातेची आरती करतात आणि बापुंना रेणुकामातेची आरती करताना पाहणे, बापुंच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारे मातृप्रेम अनुभवणे ही येथील सर्वोच्च गोष्ट आहे. बापुंचे मातृप्रेम डोळा भरून पाहण्याचा हा अनुभवसुद्धा आमच्या जीवनात रेणुका-परशुरामाला, आदिमाता चण्डिकेला आणि तिचा पुत्र असणार्या त्रिविक्रमास सक्रिय करण्यास पुरेसा आहे.
मातृतत्त्वच सर्वप्रथम
माता रेणुकेचे वात्सल्य जसे त्या महाविष्णु परशुरामाला मिळाले, त्याने ते अनुभवले, तसे आम्हां सर्वांना मिळावे यासाठी रामनवमीच्या दिवशी होणार्या रेणुकामाता-पूजनाचा, त्याचबरोबर तिच्या दर्शनाचा लाभ आम्ही घ्यायला हवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा