श्री रेणुका देवी दृष्ट

Renuka Mata aarati
श्री अनिरुद्ध बापू यांच्या पत्नी सौ नंदा अनिरुद्ध जोशी माता रेणुकेची प्रेमाने दृष्ट काढताना.
माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढुया गं दृश्ट काढुया ।।धृ।। 
माहुर गड हिचं ठाणं। भक्तासाठी केलं येणं। 
प्रेमे आनंदुनी भावे । दृष्ट काढुया।।१।। 
पहाटे जगदंबा नहाली । मग केली वेणी फणी। 
मोत्यानं गं भांग हिचा ।आपण भरुया।।२।। 
भरजरी शालू ही नेसली । अंगी काचोळी घातली। 
कैसी वेल्हाळ शोभती । दृष्ट काढुया ।।३।। 
बसायला चांदीचा पाट । जेवायला सोन्याचे ताट। 
भोजनाला पुरणपोळी । आपण वाढुया।।४।। 
मारुनी दैत्य महिषासुर । तेथे दृष्ट झाली अपार। 
भक्ती सुमने घेउनी हाती । दृष्ट काढुया।।५।। 
रेणुका दिसती सुंदर । दृष्ट होईल वारंवार। 
मीठ मोहर्‍याची दृष्ट । आपण काढुया।।६।।

टिप्पण्या