मातृवात्सल्य विंदानम म्हणजे आदिमाता तिन्ही स्तरावरील रुपांचे आख्यान. गायत्री माता, महिषासूरमर्दीनी आणि अनसूया मातेचे चरित्र.
बापू म्हणतात, की हा ग्रंथही आहे, हे गुणसंकीर्तनही आहे, ही ज्ञानगंगा आहे, ही भक्तीभागीरथीही आहे व आदीमातेचे आख्यान तर आहेच आहे. परंतु ह्या सर्वांच्या पलीकडे हे माझ्या आदीमातेचे शुभंकरा व अशुभनाशिनी स्वरुप आहे, वात्सल्य आहे व वरदानही आहे.आदिमातेने केलेल्या आज्ञेनुसार श्री परशुराम श्री गुरुदत्तातेयांकडून श्रवण केलेले व स्वतः अनुभवलेले चण्डिकेचे आख्यान नित्य स्मरण करीत राहीले व त्यांनी तिच्याच आज्ञेनुसार ऋषी सुमेधस, ऋषी हरितायन व मृकंड पुत्र ऋषि मार्कण्डेय ह्या स्वतःच्या तीन सत-शिष्यांना ह्याचा उपदेश केला. हे आख्यानाचे काही पाठ मार्कण्डेयपुराण, कालिकापुराण आणि सप्तशती आख्यानात आलेले आहे.
हा ग्रंथ म्हणजे महिषासुरमर्दिनीचा नववा अवतार "मन्त्रमालिनी" आहे. ह्या ग्रंथाचे पठण शुभंकरा आणि अशुभनाशिनी नवरात्रीत करण्यात येते. तसेच षोडशकलासंहिता पठण पध्दतीने तसेच मन्त्रमालिनीसंहिता पद्धतीने देखील पठण/पारायण करता येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा