शिवगंगागौरीMata-Shivgangagauri
माता  शिवगंगागौरी
बाह्य आणि अन्त:सृष्टीचे सन्तुलन उचित बिन्दुवर सांभाळणे हे किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांचे महत्त्वाचे कार्य आहे. पावित्र्याला स्तंभ म्हणजेच आधार देणे, उचिताला प्रेरणा देणे आणि अनुचिताचे स्तंभन करणे हे कार्य श्रद्धावानांसाठी श्रीशिवगंगागौरी सदैव करत असते. माता शिवगंगागौरीच श्रद्धावानांना आदिमाता आणि महाविष्णुच्या चरणांशी जोडून ठेवणारी, दूर जाऊ न देणारी स्तंभनशक्ती आहे. 

दैनिक प्रत्यक्षमधील तुलसीपत्र या अग्रलेखमालिकेतील वसुन्धरेच्या इतिहासासंबंधातील सद्गुरु श्रीअनिरुद्धांचे अग्रलेख वाचताना आम्हाला नक्कीच जाणवते की माता शिवगंगागौरीच्या भक्तिची आम्हाला आज अधिकाधिक गरज आहे. गुरु धौम्य ऋषि आणि त्यांचे शिष्य यांच्या कथांमध्ये आम्ही हे अनुभवले आहे.

1) सद्गुरुभक्तीच सर्व काही प्रदान करण्यास समर्थ आहे, हे सांगणारी माता शिवगंगागौरीच आहे.

2) सद्गुरुभक्तीच सद्गुरुविषयक विकल्प दूर करते हे माता शिवगंगागौरीच सांगते.

3) करुणा, अनुकंपा आणि सहृदयता यांची बीजे जर ज्ञानभूमित वाढत नसतील तर त्या ज्ञानभूमीचे रुपान्तर शुष्क व रुक्ष अशा वाळवंटामध्ये होते. हे न होऊ देणारी, अधःपतनाचे स्तंभन करणारी माता शिवगंगागौरीच आहे.

व्रती आणि सावर्णि घराण्यात ज्ञान-विज्ञान यांसह करुणा, अनुकंपा आणि सहृदयता हे तीनही गुण असलेले आम्ही पाहतो आणि याचे कारण त्यांच्यात असणारी आदिमाता-भक्ती आणि त्रिविक्रम-भक्ती हेच आहे; तर अन्य अनुनाकीय, ड्रॅको, ड्रुईड वगैरे निशाचरांकडे ज्ञान-विज्ञान जरी जबरदस्त असले तरी करुणा, अनुकंपा आणि सहृदयता नसल्याचे आम्ही पाहतो. वर्तमान युगात या मुद्दयाकडे लक्ष देण्याची गरज नाही का?

4) माता शिवगंगागौरीच आम्हाला ‘न्यग्रोधभूम’ क्षेत्री नेऊन स्थिर करणारी आहे. या पवित्र क्षेत्री विषारी बीजांना नाहीसे करून फक्त पवित्र बीजांचीच वाढ केली जाते.

5) ‘श्रीश्वासम्’च्या तयारी साठी बापूंनी आम्हाला ‘शिवगंगागौरी अष्टोत्तरशत नामावलि’ जास्तीत जास्त वेळा वाचण्यास सांगितले आहे. आदिमातेकडून प्राप्त होणारी कृपा ज्या स्रोतांच्या, चॅनल्सच्या माध्यमातून आम्हाला मिळते, त्या स्रोतांमधील अवरोध दूर करून स्रोतास ‘अनिरुद्ध’ बनवण्याचे कार्य माता रेणुकाच करते.

6) माता शिवगंगागौरीच श्रद्धावानांना आदिमाता आणि महाविष्णुच्या चरणांशी जोडून ठेवणारी, दूर जाऊ न देणारी स्तंभनशक्ती आहे.
अशा या माता रेणुकेच्या अभिषेक-पूजन-आरती सोहळ्याचे दर्शन रामनवमीला घेणे यामुळे आमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या विषांचा, दुर्वृत्तिंचा नाश होणार आहे, अरिष्टांचे स्तंभन आणि अभीष्टाचे प्रवाहण होणार आहे.

मातृप्रेमाचे ऐश्वर्य रेणुकेकडे आहे, ‘अनिरुद्धवरदा’ अशी रेणुकाच आहे, हेच आम्हाला ‘माता शिवगंगागौरी अष्टोत्तरशत नामावलि’तील 106, 107 आणि 108 ही नामे सांगतात.
106 - ॐ मात्रेश्वर्यै नमः ।
107 - ॐ रेणुकायै नमः ।
108 - ॐ अनिरुद्धवरदायै नमः ।
जय जय मातेश्वरी श्रीरेणुके पाहि माम् पाहि माम् ।
mata-shivgangagauri-gadastrotra
माता शिवगंगागौरी गदास्तोत्र

टिप्पण्या