रामजन्म साजरा करताना श्रद्धावानाच्या
मनात हाच भाव असतो की ‘माझा राम’ माझ्या जीवनात प्रकटला आहे. या रामाला जन्म कोण देते?
रामाला कोण प्रकटवते? बाळाला कोण प्रकटवते? अगदी सरळ सरळ स्थूल स्तरावरील उत्तर आहे-
माता बाळाला जन्म देते. आई प्रसूत होते आणि बाळाचा जन्म होतो.
अर्थात ‘बाळ आईला जन्म देते’
हेदेखील खरे आहे कारण बाळाच्या अस्तित्वात येण्याने तिला आईपण प्राप्त होते, बाळाच्या
जन्माबरोबर आईचाही जन्म होतो. पण आपण सरलार्थाने विचार करूया. आम्हाला येथे उमगले की
रामाची माताच रामाला प्रकटवणारी आहे.
येथे आम्हाला दैनिक प्रत्यक्षमधील
अनिरुद्ध बापूंच्या तुलसीपत्र या अग्रलेख मालिकेचा संदर्भ अभ्यासला पाहिजे.
तेथे आदिमाता चण्डिका तिचा दरबार बोलावते आणि महाविष्णुला परशुराम, राम आणि कृष्ण हे
अवतार घेण्याची आज्ञा देते. महामत्स्य ते बटुवामन या अवतारांमध्ये महाविष्णु लीला करण्यासाठी
अवतारकार्यापुरता प्रकट झालेला असतो. मातेच्या पोटी मानवी अर्भकाप्रमाणे त्याने मानवजन्म
घेतलेला नसतो.
भगवान परशुराम मातेसह |
महाविष्णुचा सहावा अवतार असणारा
परशुराम हा असा पहिला अवतार आहे की ज्या अवतारात तो मानवी मर्यादांचे पूर्ण पालन करून
मानवी बालकाप्रमाणे जन्म घेणार असतो. आदिमातेच्या संकल्पानुसार स्वतः भगवान किरातरुद्र आणि माता शिवगंगागौरी परशुरामाचे पिता व माता बनून अवतीर्ण होणार असतात.
सत्ययुगामध्ये अत्रि आणि अनसूयारुपाने
आदिमाता चण्डिकेनेच पृथ्वीवरील मानवत्व धारण केले होते. ‘‘हेच मानवत्व तुम्हाला मानवी
जीवन जगताना मार्गदर्शक ठरेल’’ असे आदिमाता त्यावेळी किरातरुद्र आणि शिवगंगागौरी यांना
सांगते.
‘‘माझ्या अत्रिस्वरूपाकडील
अग्नि जमदग्निकडे ‘पवित्र क्रोध’ म्हणून येईल, तर माझ्या अनसूयास्वरूपातील माझ्याकडील
धर्माचरण रेणुकेकडे ‘पातिव्रत्य’ व ‘पराक्रमविद्या’ म्हणून येईल’’, असेही आदिमाता त्यावेळी
सांगते.
सारांश, परशुराम या अवतारात
हा महाविष्णु मानवी माता आणि मानवी बालक यांच्यातील प्रेम प्रत्यक्ष मानवी देह धारण
करून अनुभवतो. मानवी मातेचे वात्सल्य तो याच अवतारात स्वतः मानवी देह धारण करून अनुभवतो,
मानवाप्रमाणे जीवनातील भावस्थित्यन्तरेसुद्धा अनुभवतो.
पुढे राम अवतारात तो कौसल्येच्या
पोटी जन्म घेतो, कृष्ण अवतारात देवकी-यशोदेचे वात्सल्य अनुभवतो. त्याच्या मानवी मातांवरसुद्धा
तो भरभरून प्रेम नक्कीच करतो, पण तरीही सर्वप्रथम मानवी माता-मानवी बालक या परमपवित्र
नात्याचा अनुभव या महाविष्णुने परशुराम म्हणूनच घेतला हे विसरून चालणार नाही.
त्याचमुळे रामनवमीला, महाविष्णूचा सातवा अवतार राम याच्या जन्माच्या सोहळ्यापूर्वी श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे वात्सल्यस्वरुप परमात्म्याच्या प्रथम मानवी मातेचा अर्थात रेणुका देवीचे पूजन मोठ्या उत्साहाने केले जाते.
त्याचमुळे रामनवमीला, महाविष्णूचा सातवा अवतार राम याच्या जन्माच्या सोहळ्यापूर्वी श्री अनिरुद्ध उपासना फाऊंडेशनतर्फे वात्सल्यस्वरुप परमात्म्याच्या प्रथम मानवी मातेचा अर्थात रेणुका देवीचे पूजन मोठ्या उत्साहाने केले जाते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा