रामनवमी उत्सव
रामनवमी उत्सव गेली अनेक वर्षे
सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या मार्गदर्शनानुसार श्रद्धावान साजरा करीत आहेत. रामजन्म
हा या उत्सवातील महत्त्वाचा सोहळा असला, तरी त्याचबरोबर या पावन पर्वावर श्रीहरिगुरुग्रामयेथे सद्गुरु श्रीअनिरुद्धांच्या निर्देशानुसार सहस्रधारा अभिषेकासह रेणुकामातेचे षोडशोपचारपूजनही केले जाते.
रामनवमी उत्सव आणि त्या पवित्र
पर्वावर संपन्न होणारे रेणुकामाता साभिषेक अर्चन यांद्वारे परमपवित्र स्पंदनांचा लाभ
श्रद्धावान मित्रांना मिळावा हीच सद्गुरु श्री अनिरुद्धांची इच्छा आहे.
श्रीसाईसच्चरितातील सहाव्या अध्यायात आम्ही सद्गुरु श्रीसाईनाथांनी शिरडी येथे श्रद्धावानांकडून साजरा करविल्या गेलेल्या शिरडीतील पहिल्या रामनवमी उत्सवाची कथा वाचतो. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे असणारे प्रयोजन हेमाडपंतांनी लिहिलेल्या ओव्यांमधून आम्हाला कळते.
श्रीसाईसच्चरितातील सहाव्या अध्यायात आम्ही सद्गुरु श्रीसाईनाथांनी शिरडी येथे श्रद्धावानांकडून साजरा करविल्या गेलेल्या शिरडीतील पहिल्या रामनवमी उत्सवाची कथा वाचतो. रामनवमी उत्सव साजरा करण्यामागे असणारे प्रयोजन हेमाडपंतांनी लिहिलेल्या ओव्यांमधून आम्हाला कळते.
‘करावा रामजन्मोपक्रम । लाधेल परम कल्याण ॥
ही ओवी रामनवमीचा उत्सव साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करते.‘आपल्या जीवनात जोपर्यंत राम प्रकटत नाही तोपर्यंत आपले परम कल्याण होत नाही’हे आम्हाला येथे कळते आणि ‘राम आमच्या जीवनात प्रकटावा’ यासाठीच साईनाथ हा उत्सव साजरा करून घेत आहेत, हे आम्हाला उमगते. पुढे उत्सवात रामजन्माच्या वेळी तसे घडतेही.
रामजन्माचिया अवसरी । गुलाल बाबांच्या नेत्राभीतरी ।जाऊनि प्रगटले बाबा नरहरी । कौसल्येमंदिरी श्रीराम ॥गुलालाचे केवळ मीष । रामजन्माचा तो आवेश ।होईल अहं-रावणाचा नाश । दृर्वृत्ति-राक्षस मरतील ॥
- श्रीसाईसच्चरित 6/84, 85
‘अनिरुद्धमहावाक्य’देखील आम्हाला
‘आमच्या जीवनात राम प्रकटणे का महत्त्वाचे आहे’, हे स्पष्टपणे सांगते.
युद्धकर्ता श्रीरामः मम । समर्थः दत्तगुरु: मूलाधारः ।साचारः वानरसैनिकोऽहम् । रावणवधः निश्चितः ॥इति अनिरुद्धमहावाक्यम्॥ |
माझ्या जीवनात माझ्यासाठी युद्ध
करणारा ‘माझा’ राम प्रकटण्यानेच दुष्प्रारब्धरूपी रावण आणि त्याच्या दुर्वृत्तिरूपी
निशाचारचमूचा नाश होतो. पण त्यासाठी ‘राम माझा’ व्हायला हवा आणि त्याआधी....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा