माता रेणुका आणि तिचा पुत्र भगवान परशुराम |
ईश्वरी स्तरावर मोठी वहिनी
(किरातरुद्रपत्नी) असणारी माता शिवगंगागौरी महाविष्णुला मातेसमानच आहेच, किंबहुना माताच
आहे; पण तीच रेणुका या रूपात त्याची मानवी रूपातसुद्धा प्रत्यक्ष माताच आहे. त्यामुळे
रेणुका या रूपात माता शिवगंगागौरीचे मातृत्व पूर्णत्वाने अभिव्यक्त झाले आहे, प्रकट
झाले आहे. रेणुका म्हणून ईश्वरी आणि मानवी रूपात एकाच वेळेस ती महाविष्णुची सर्वार्थाने
माता आहे.
‘मातृवात्सल्यविंदानम्’मध्ये
आम्ही वाचतो की आदिमाता चण्डिकेच्या ‘शताक्षी’ या सौम्य शांत व वत्सल रूपाचे आणि कार्याचे
आख्यान दत्तात्रेयांकडून ऐकून परशुरामाला, त्याला अत्यंत प्रेमाने घास भरविणार्या
त्याच्या रेणुकामातेचे तीव्र स्मरण होते.
आदिमाता चण्डिकेनेच या माता-पुत्राचे
अनन्यप्रेमाचे पवित्र नाते आमच्यासमोर आदर्श म्हणून ठेवले आहे. तिनेच मातृतत्त्वाशी
रेणुकेचे नाम कायमचे जोडले आहे. तुलसीपत्र अग्रलेखमालिकेमध्ये आम्ही वाचतो की माता
शिवगंगागौरीच्या रेणुका या सातव्या अवतारास आदिमातेने ‘मातेश्वरी/मात्रेश्वरी’ हे
नामाभिधान दिले आहे, तर जमदग्निंचे नाम ‘तपोभैरव’ हे आहे.
रेणुकेने देहत्याग केल्यानंतर श्रीगुरु दत्तात्रेयांच्या
कृपेने परशुरामाची रेणुकामातेशी जिथे पुन्हा भेट झाली, ते माय रेणुकेचे स्थान मातापुर/
मातृपुर म्हणून ओळखले जाते. सारांश, मातृतत्त्वाशी, मातृत्वाशी रेणुकामातेचे नाम अतूटपणे
अखंड जुळले आहे.
रेणुका-परशुराम या माता-पुत्रांचे
वत्सल नाते सर्वच दृष्ट्या अजरामर, एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्च आहे. या संबंधित मुद्दयांची
उजळणी आपण थोडक्यात करूया.
1) ईश्वरी नात्याने माता-पुत्र
असणारे शिवगंगागौरी-महाविष्णु हे रेणुका-परशुराम या मानवी रूपात वसुन्धरेवर सर्वप्रथम
माता-पुत्र म्हणून अवतरतात.
2) रेणुकाच महाविष्णु परशुरामाला
श्रीगुरु दत्तात्रेयांच्या चरणांवर घालते. ईश्वरी नात्याने महाविष्णुचा सर्वांत मोठा
भाऊ असणारे आणि सद्गुरु असणारे श्रीगुरु दत्तात्रेय महाविष्णुच्या परशुराम या अवतारात
प्रत्यक्ष मानवी सद्गुरु होतात.
विश्वातील गुरुशिष्याची सर्वोच्च जोडी या अवतारातच
आमच्यासमोर येते आणि यांना जोडणारी आहे माता रेणुका. (‘मातृवात्सल्यविंदानम्’ प्रकटले
आहे ते श्रीगुरु दत्तात्रेय आणि परशुराम यांच्या संवादातूनच)
3) पिता जमदग्निंकडून म्हणजेच
किरातरुद्राकडून महाविष्णु परशुराम-रूपात विद्या ग्रहण करतो आणि रेणुकामातेकडून त्याला
‘आदितिविद्या’ प्राप्त होते.
4) श्रीगुरु दत्तात्रेय परशुरामाला,
रेणुकेने देहत्याग केल्यावर परशुरामाच्या मातेस भेटण्याच्या उत्कट इच्छेनुसार रेणुकेची
पुन्हा भेट घडवतात. मातृप्रेमी सद्गुरुने मातृप्रेमी शिष्याची त्याच्या मातेशी तिने
देहत्याग केल्यानंतर काही वर्षांनी अशा प्रकारे भेट घडवणे ही अलौकिक, प्रेमाचे शिखर
असणारी घटना
5) स्वतः परशुरामाने रेणुकेची
मूर्ती मातृप्रेमाने घडवली. ‘रेणुका’ हीच माता शिवगंगागौरीची प्रथम घडवलेली मूर्ती,
तीही प्रत्यक्ष महाविष्णुच्या हातून, तिच्या पुत्राच्या हातून. (‘मातृवात्सल्यविन्दानम्’मध्ये
आदिमाता चण्डिका गायत्रीची पंचमुखी आकृति परशुरामाने श्रीगुरु दत्तात्रेयांच्या आज्ञेने,
त्यांच्या उपस्थितीत रेखांकित केल्याची कथा आम्ही वाचतोच.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा