रेणुका माता पूजन |
रामनवमीच्या उत्सवात उत्सवस्थळी रेणुकामातेच्या आगमनाची वाट श्रद्धावान पाहत असतात. तांदळ्याच्या रूपातील रेणुकामातेचे आगमन होताच मातेचा जयजयकार केला जातो आणि रेणुकामातेचे औक्षण करून मंगलवाद्यांच्या गजरात उत्साहाने स्वागत केले जाते. रेणुकमातेस विराजमान होण्यासाठी बनवलेल्या खास मंचावर मातेल सन्मानाने स्थानापन्न केले जाते.
सहस्रधारा-अभिषेक |
स्वतः बापू रेणुकामातेची आरती
करतात आणि बापुंना रेणुकामातेची आरती करताना पाहणे, बापुंच्या चेहर्यावर ओसंडून वाहणारे
मातृप्रेम अनुभवणे ही येथील सर्वोच्च गोष्ट आहे.
बापुंचे मातृप्रेम डोळा भरून पाहण्याचा हा अनुभवसुद्धा आमच्या जीवनात रेणुका-परशुरामाला, आदिमाता चण्डिकेला आणि तिचा पुत्र असणार्या त्रिविक्रमास सक्रिय करण्यास पुरेसा आहे.
बापुंचे मातृप्रेम डोळा भरून पाहण्याचा हा अनुभवसुद्धा आमच्या जीवनात रेणुका-परशुरामाला, आदिमाता चण्डिकेला आणि तिचा पुत्र असणार्या त्रिविक्रमास सक्रिय करण्यास पुरेसा आहे.
रेणुकामातेचे अर्चन अशा प्रकारे
संपन्न झाल्यावर मगच रामजन्म होतो आणि सोहळ्यातील अन्य कार्यक्रमांची सुरुवात होते.
‘मातृतत्त्वच सर्वप्रथम’ ही प्राथमिकता (प्रायॉरिटी) बापुंच्या प्रत्येक आचरणातून आम्हाला
सुस्पष्टपणे कळते. मग ‘सद्गुरुतत्त्वच सर्वप्रथम’ ही माझी प्राथमिकता आहे का? हा प्रश्न
मला अन्तर्मुख करतो. मला हा उत्सव माझ्या जीवनातील प्राथमिकता निश्चित करण्यास शिकवतो.
ज्या रेणुकामातेने या परमात्म्यास
सर्वप्रथम मानवी मर्यादा धारण करून मानवी रूपात या विश्वात प्रकटवले, त्या माता रेणुकेचे
पूजन करण्यामागे श्रद्धावानांचा भाव हाच असतो, श्रद्धावानांची प्रार्थना हीच असते की
हे माते रेणुके, हे मातेश्वरी रेणुके, तू आमच्या जीवनविश्वात या परमात्म्याला प्रकटव.
या परमात्म्याचा जन्म आमच्या विश्वात होताच मग रामराज्य येणारच, हा महाविष्णु आमच्या
जीवनात प्रकटताच रावणवध निश्चित होणारच.
मुलाचा वाढदिवस हा त्याच्या
आईचासुद्धा ‘आई’ म्हणून वाढदिवसच असतो. आम्ही मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तशा
त्या मुलाच्या आईलाही शुभेच्छा द्यायला हव्यात, तिच्या मातृत्वास वंदन करावयास हवे
कारण ती माता काबाडकष्ट वेचून तिच्या अपत्यास जन्म देते, वाढवते. ती माताच त्याला विश्वात
प्रकट करून समर्थ बनवते.
आदिमाता चण्डिका |
आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र
परमात्मा या दोघांची भक्ती दृढ करणारी माता शिवगंगागौरीच आहे. ती स्वतः तिच्या मातेची
म्हणजेच आदिमातेची परमभक्त आहे आणि तीच रेणुकारूपात महाविष्णुची सर्वार्थाने माता आहे.
म्हणूनच माता रेणुकेच्या पूजनाने
आम्ही आदिमाता चण्डिका आणि तिचा पुत्र महाविष्णु यांची भक्ती दृढ करण्याचे सामर्थ्य
प्राप्त करतो. रामनवमीला होणार्या या सोहळ्याच्या दर्शनाने आमच्यात ही भक्ती आणि मर्यादा
नक्कीच दृढ होते.
रेणुका मातेचा तांदळा |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा